‘राक्षसी’ पोलीसी चाचणी!

NEWS

ते मराठी तरुण ‘नोकरी’ मागायला आले होते….. ऐन तारुण्यात ‘मरण’ मागायला नव्हे !!!
आमचे पाच ग्रामीण मराठी तरुण बळी गेले आणि काल `सहावा’ बळी गेला,

‘राक्षसी’ पोलीसी चाचणीत!….. एकदोघांनी चाचणीअंति वैफल्यग्रस्त होऊन आत्महत्येचा

प्रयत्न कालपरवाच केला. …….हे काय चाललयं, या शिवछत्रपतींच्या महाराष्ट्रात ?

लहानपणी आम्ही सर्कशीत “मौत का कुवाँ” हा, मृत्युचं चुंबन घेणारा थरारक अनुभव घ्यायचो …. मात्र, असली “मौत की दौड” प्रथमच अनुभवतोयं…..
भरदुपारी रणरणत्या उन्हात आणि अतिरेकी दमट हवामानात, आमच्या मराठी तरुणांना, ही जीवघेणी ५ किलोमीटरची दौड, नेमकी पोलीसदलातल्या कुठल्या विकृत राक्षसांनी करायला लावली ? हप्त्याच्या पैशातून रात्री इंपोर्टेड प्यायलेल्या बिगरमराठी IPS पोलीस अधिका-यांची काय सकाळी उशीरापर्यंत झोप उडाली नव्हती; म्हणून आमच्या गरीब घरच्या मराठी तरुणांना दमट हवामानात व आग ओकणा-या उन्हात धावायला लावलं त्यांनी ? २१-२२ जून हा वर्षातला सर्वात मोठा दिवस; म्हणजे, आभाळात ढगांचं आच्छादन नसेलं तर, संपूर्ण जून महिना म्हणजे रणरणतं वाळवंट व त्यात भरीसभर म्हणून ‘जागतिक तापमानवाढीचे चटके’ ! जेव्हा, नुसतं रस्त्यानं चालणंसुद्धा म्हणजे, घामानं आंघोळ करणं आहे; तिथे, ही असली नोकरीसाठी ‘मरणा’ची धाव ???… त्या मराठी तरुणांना, “भाग मिल्खा भाग” म्हणत दौडत लावायला, ते काय ऑलिंपिक-मॅरॅथॉनचे धावपटू होते… जे, वर्षानुवर्षे लांब अंतराच्या धावण्याचा सराव करत असतात(या व्यावसायिक धावपटूंसाठीही अँब्युलन्स, ग्लुकोजचं पाणी, फर्स्ट-एड, डॉक्टर्स सारं काही असतं)…..???  पायात पेटके येत असताना…. छाती फुटायची वेळ आली तरी ते पुढे धावत राहीले; कारण, त्यांच्याच महाराष्ट्रात त्यांच्यासाठी मागे काही भविष्य शिल्लक राह्यलेलं नव्हतं म्हणून ! “उच्चशिक्षित व कर्तृत्त्ववान माणूस झाला की, तो हमखास निर्दय, निष्ठूर व माणूसकीशून्य बनतो !”… त्याच पठडीतल्या या सर्व संबंधित माजो-या पोलीस अधिका-यांवर ‘सदोष मनुष्यवधा’चा गुन्हा दाखल करणंसुद्धा सौम्य ठरेल; त्यांच्यावर ‘खुना’चाच गुन्हा दाखल केला गेला पाहीजे…..आणि,   पोलीस-चाचणीचा हा असा अमानुष निर्णय घेण्यात, जर ‘कु-हाडीचा दांडा गोतास काळ’…. म्हणून कुणी ‘मराठी’ पोलीस अधिकारी जबाबदार असतील तर, त्यांची प्रथम गाढवावरुन धिंड काढून मगच, त्यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल केला पाहीजे. प्रश्न दौड ५ कि.मी.ची ठेवायची की, नाही…. एवढ्यापुरता मर्यादित नाही. ती कशी ठेवायची, कधि ठेवायची हा ही महत्त्वाचा मुद्दा आहे…. शिवाय, यासंदर्भात इतरेप्रांतीयांच्या तुलनेत, गरीबीमुळे उपनगरांच्या कोंडवाड्यात राहणा-या, सामान्य मराठी तरुणतरुणींची ढासळत चाललेली शरीरयष्टी, हा ही चिंतेचा मुद्दा आहे, हे मुळीच विसरुन चालणार नाही(अनेक सर्वेक्षणांनी हा मुद्दा अधोरेखित केलेला आहे).

बरं, हे सर्व कशासाठी तर, एकूण रु.२०,०००/- (हातात, जेमतेम रु.१२०००/-) रुपड्यांसाठी….. मुंबईतल्या २,५०० जागा भरण्यासाठी आमची १ लाखाहून अधिक आणि, महाराष्ट्रातील एकूण १२,००० जागांसाठी तब्बल ४ लाखाहून अधिक, मराठी तरणीबांड पोरं स्पर्धक म्हणून भरउन्हात धावत सुटली…. जीवाची पर्वा न करता, ऊर फाटेस्तोवर धाव धाव धावली. ५ जण बळी गेले, याचा अर्थ, पाच-पन्नास हजाराहून अधिकांचे प्राण, ती तळपत्या उन्हातील जीवघेणी धाव पू्र्ण करताना, कंठाशी आले असणार… नशिब बलवत्तर म्हणून ते वाचले म्हणायचे ! शेक्सपियरच्या कथेतला माणूस सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत धावता धावता मेला तो, खंडोगणती जमीन मिळवण्याच्या हव्यासापोटी आणि आमची मराठी पोरं धावताना मेली ती मात्र, फडतूस पोलीसी नोक-यांसाठी…. ही प्रत्येक मराठी अंत:करणातली तडफड आहे !

याचा अर्थ एक आणि एकच, …..’मराठी-मरण’ महाराष्ट्रातच खूप स्वस्त झालयं…..
जगातील युद्धांचा इतिहास तपासून पाहीला तर, शत्रूपक्षाच्या हाती सापडलेल्या एखाद्या नागरिकाचा प्राण वाचविण्यासाठीसुद्धा राष्ट्राराष्ट्रांमध्ये युद्धं पेटलेली दिसतीलं…  ‘कुत्र्याच्या मोतीनं मरण’, असं जे काही म्हटलं जातं…. ते अशाप्रकारच्या स्वस्त ‘मराठी-मरणा’पेक्षा वेगळं काही असू शकत नाही. लाखो शेतक-यांच्या ग्रामीण आत्महत्या असोत वा शहरांमध्ये, आर्थिक-कोंडीतून सुटकेचा मार्ग सापडत नसल्यानं, सहकुटुंब होणा-या घाऊक स्वरुपाच्या मराठी-आत्महत्या असोत, …. सा-या, या एकाच सदरात मोडतात.

गेल्या ४०-४५ वर्षांपासून, आमचा ‘मराठी-पाय’ मराठी राजकारण्यांच्या नौटंकी भाषणांच्या भुलभुलैय्यानं व त्यांनी आयोजित केलेल्या सार्वजनिक सण-उत्सवांच्या ‘अफूच्या मात्रे’नं महाराष्ट्राच्याच लालकाळ्या मातीच्या दलदलीत खोल खोल फसत चाललायं….. पण, त्याला हे उमगेल, तर शपथ ! ‘अँटेलिया’सारखे डोळे फाडणारे ‘परप्रांतीय-धनवैभव’ मुंबई-महाराष्ट्राच्या नाक्यानाक्यावर-कोप-याकोप-यावर सामान्य मराठी माणसाच्या नाकावर टिच्चून उभं राहत असतानाचं हे, मन भयंकर अस्वस्थ करणारं दाहक वास्तव आहे ! ….स्वत:च्या आणि आपल्या कंपूच्या ‘राजकिय व आर्थिक’ फायद्यासाठी मराठी माणसाची पद्धतशीर ‘आर्थिक-कोंडी’ होऊ देण्याचं ‘पाप’, या महाराष्ट्रात मराठी माणसांच्या नांवाने १९६९ सालापासून गळे काढणा-या(पण, प्रत्यक्षात गळे कापणा-या) व महाराष्ट्राची सत्ता भ्रष्ट ‘सहकारा’च्या माध्यमातून इतकी वर्ष वेडीवाकडी भोगणा-या ढोंगी व दलाल ‘मराठी-राजकारण्यां’चं आहे ! गुजराथ्यांशी ‘बिझनेस-पार्टनरशिप’ करणा-या मराठी राजकारण्यांच्या नादानं, ‘मराठी माणूस’ गुजराथ्यांच्या हातात ‘धनसत्ता’ तर केव्हाचीच देऊन बसलायं…. पण आता, ‘धनसत्ते’च्या बरोबरीनं ‘राजसत्ता’सुद्धा गुजराथ्यांच्या हातात देण्याचं ‘महापातक’ मराठी तरुणतरुणींनो, तुमच्या…. हो, तुमच्याच हातून घडतयं… घडलयं, ‘मोदी-सरकार’ला विजयी करुन आणि ठाणे लोकसभा मतदारसंघात  ‘धर्मराज्य पक्षा’सारख्या, केवळ तुमच्याआमच्या मराठी पिढ्यापिढ्यांच्या हितासाठी, ‘सतीचं वाणं’ हाती घेऊन राजकारणात पाय रोवू पाहणा-या पक्षाला साफ लाथाडून……. ज्याला, इंग्रजी परिभाषेत “सेल्फ-डिस्ट्रक्टीव्ह् मोड”(Self-Destructive Mode) म्हणतात; म्हणजे, स्वत:च स्वत:चा सर्वनाश करायला निघण्याची प्रक्रिया…. ज्यासाठी, इतर बाहेरच्या शत्रूंनी काहीही करायची गरज नाही !

यापुढे, सर्वसामान्य मराठी तरुणांच्या जगण्याची किंमत यापेक्षा कधिही अधिक नसेलं….. ‘कंत्राटी पद्धतीतली गुलामगिरी’ नको(महाराष्ट्रातच नव्हे तर, संपूर्ण देशात; विशेषत:, नरेंद्र मोदींच्या गुजरातमध्ये अन्याय-शोषणाचं थैमान घालणारी) …. त्यातलं ‘पोट मारणारं’ शोषण नको; म्हणून, महाराष्ट्रातला सामान्य घरातला अर्धशिक्षित मराठी-तरुण जीवघेण्या चाचणी-परीक्षेचही दिव्य पार पाडायला ‘जीवावर उदार होऊन’ तयार झाला; हे महाराष्ट्रातील लांछनास्पद असं भीषण वास्तव, तुमच्या सगळ्या बदमाष राजकारण्यांकडून ‘लपवलं’ जातयं…. ती त्यांची राजकिय व आर्थिक सोय आहे ! जशी चोरट्या ‘बोक्या’ची नजर कायम ‘शिंक्या’वर असते; तशी, राजकारण्यांची ‘भ्रष्टाचारातून म्हणजेच लुटालुटीतून मिळणा-या पैशाकडे आणि निवडणुकीतल्या मतांकडे’ असते. त्यामुळे, ‘धदेवाईक’ राजकारण्यांचे ‘हाकारे’ या संतापजनक घटनेनंतर, आपल्या पक्षाच्या शिडात हवा भरुन घेण्याइतपतच स्वाभाविकरित्या मर्यादित राहताना दिसतायतं ! महाराष्ट्रातच सामान्य मराठी-तरुणांची जी, ‘जगण्याचीच कोंडी’ झालीयं…. त्याला संपूर्ण नागवून, ज्या पद्धतीनं पूर्णत: हतबल व असहाय्य केलं गेलेयं…. त्याची साफ ‘कोंडी’ करुन त्याचं खच्चीकरण केलं गेलयं…. त्यांचं मूळचं स्वत:च एकमेव भांडवल असलेली ‘मराठी-नीतिमत्ता’, ……पद्धतशीररित्या या राजकारण्यांकडून त्याला कर्जबाजारी, व्यसनाधीनता व फुकटेपणाची सवय दीर्घकाळ जडवली जाऊन, साफ खलास केली गेलीयं…. हे भयानक वास्तव दडपण्यासाठी सध्या मराठी राजकारण्यांची आपापसात ‘नौटंकी चिखलफेक’ चाललीयं. यापैकी कोणालाही य:किंचितही महाराष्ट्रातल्या मराठी तरुणांची फिकीर असेल; तर तो, मराठी तरुणांचं मूळ दुखणं असलेल्या, ‘नव-गुलामगिरी व नव-अस्पृश्यते’ समान असणा-या ‘कंत्राटी-कामगार पद्धती” विरुद्ध एल्गार पुकारेल व तिला नष्ट करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करेलं…. झालायं आतापर्यंत असा काही प्रयत्न, या सर्वपक्षीय नौटंकी-राजकारण्यांकडून ? असं कधितरी होईल का, या राजकारण्यांच्या हातून, जे ‘कंत्राटी-कामगारपद्धती’तलं मराठी तरुणांच्या टाळूवरचच लोणी खातायतं ???
आता, सामान्य मराठी तरुणांनी, …….राजकारण्यांनी आणि गुजराथी धनाढ्य दुकानदार-व्यापा-यांनी काळ्या पैशांतून लावलेल्या रोख रकमेच्या हव्यासापोटी, ठाणे-मुंबईसारख्या शहरांतून धोकादायक “दहीहंडी”साठी किंवा फडतूस पोलीसी नोकरीसाठी जीवावर उदार होऊन प्राण पणाला लावायचे, बस्स् ! …… आणि, या सगळ्या भ्रष्ट-अमानुष ‘सिस्टीम’मधल्यांनी ‘कोंबड्यांची झुंज’ मजेत पहावी, तशी मराठी तरुणांच्या व्यर्थ लागलेल्या प्राणांच्या बाजीची मजा बघत ‘एंजॉय’ करायचं.

महाराष्ट्रात हे हरामखोर-पाजी अमराठी आएएस् आणि आयपीएस अधिकारी दिसणं, तेव्हाच बंद होईल; जेव्हा, महाराष्ट्राची संपूर्ण व्यवहाराची भाषा फक्त आणि फक्त मराठीच होईल…. मराठी तरुणांचे जीवन उध्वस्त करणा-या अमराठी सरकारी अधिका-यांना आणि मातलेल्या शेठजींना, भैय्यांना आणि इतर सगळ्याच अमराठी भाषिकांना, एकतर ‘मराठी’ ही, जगण्याची-कुटुंबकबिल्याची भाषा बनवून, मराठी-संस्कृतित ख-या अर्थानं दुधातल्या साखरेसारखं प्रथमच  पूर्णपणे विरघळावं लागेल(आजपर्यंत बोललं गेलं, तसं नकली-नौटंकी नव्हे !) …अन्यथा, महाराष्ट्रातून चालतं व्हावं लागेलं; अशी परिस्थिती आपणच निर्माण करायला हवी ! ज्या भारतीय राज्यघटनेचा आधार घेऊन हे परप्रांतीय षड्यंत्र कित्येक दशकं महाराष्ट्रात फसफसत राह्यलयं, ती राज्यघटना आरपार बदलावी लागेल…  त्या राज्यघटनेनचं घात झालायं मराठी माणसांचा !!!  घटनेच्या कलमांचा जप करत, कोणीही आला आणि मराठी-संस्कृतिला ‘वाकुल्या’ दाखवत, महाराष्ट्राच्या छाताडावर आपलं घातकी अस्तित्व निर्माण करुन ठिय्या देऊन बसला !

ज्या ३७० कलमामुळे काश्मीरची ‘काश्मीरियत’ आजवर वाचलीयं(मूळ काश्मीरी पंडितांना विस्थापित करणारा मुस्लीम आतंकवाद अत्यंत कठोरपणे मोडून काढला पाहीजे… यात वाद असूच शकत नाही; पण, तो स्वतंत्र वेगळा विषय आहे) तो “काश्मीर-पॅटर्न” किंवा तामीळ भाषाच व्यवहाराची भाषा करु पहाणारा “तामीळनाडू-पॅटर्न” आपल्याला घटनेत मोठा बदल करुन फार उशीर होण्याअगोदर आणावाच लागेल…  काहींना यातून अराजक माजण्याची भिती वाटू शकेल; पण, या समुद्रमंथनातून जे काही घडेल, त्यातून महाराष्ट्रात फिरुन ‘महन्मंगल मराठी-संस्कृतिचा मंगलकलश’ कायमस्वरुपी नक्कीच महाराष्ट्राच्या हाती येईल ! …त्यातूनच केवळ देशाचं ऐक्य टिकू शकेल व एक ऐतिहासिक घुसळणं होऊन मराठी संस्कृतिच्या हिताच ‘नवनीत’ बाहेर पडू शकेल…जे काही घडेल ते, आजच्या तुमच्याआमच्या जगण्याच्या कोंडमा-यापेक्षा नक्कीच चांगलं असेलं….. नाहीतरी, समर्थ रामदास म्हणालेच आहेत, ‘देव मस्तकी धरावा, अवघा हलकल्लोळ करावा !’… महाराष्ट्रातल्या ‘जेजुरी’चा खंडेराया मस्तकी धरुया आणि महाराष्ट्रभर अवघा हलकल्लोळ करुया…. जबाबदारी, मराठी-संवेदना अजून जागी असलेल्या प्रत्येक मराठी तरुणतरुणीची आहे ! एकदा भाषिक प्रांतरचना अनिवार्य झाली म्हटल्यावर, प्रत्येक राज्याच्या जन्मासोबतच त्याची पारंपारिक मातृभाषा(उदा. महाराष्ट्राची फक्त मराठी, तामीळनाडूची तामीळ, गुजरातची गुजराथी) हीच, संपूर्ण राज्यातल्या एकूणएक व्यवहारांची भाषा व्हायलाच हवी होती. स्वातंत्र्यप्राप्तीनंतरची ती घोडचूक, आपण ‘धर्मराज्य पक्षा’च्या माध्यमातून सुधारुया… दृष्ट लागलेल्या मूळ सोन्यासारख्या मायमराठी-संस्कृतिचा महाराष्ट्रभर गजर करुया आणि महाराष्ट्रातल्या अष्टविनायक, जेजुरीचा खंडोबा, तुळजाभवानी, शिर्डीचे साईबाबा या महाराष्ट्रातल्या आराध्य दैवतांना हा ‘महाप्रसाद‘ अर्पण करुन ख-या अर्थानं त्या दैवतांना प्रसन्न करुया !!!
…. मुंबईसह महाराष्ट्र, मराठी माणसांचा आहे…. महाराष्ट्र म्हणजे, भय्ये, गुजराथी, मारवाड्यांची जहागिरी नव्हे !

आणि, समजा हे घडलं नाही…. मराठी माणूस गेली ४०-४५ वर्ष ज्या नौटंकी घराणेबाज राजकारण्यांच्या नादी लागत आपलं भविष्य, त्यांच्या हाती वेंधळ्यासारखं सोपवत आलायं, तसाचं तो याहीपुढे नादावत राह्यला; तर, महाराष्ट्राच्या छाताडावर आज चाललायं त्यापेक्षाही अधिक, अमराठींचा नंगानाच चालेलं….. उद्योग, व्यापार, धंदे…. गुजराथी-मारवाडी-सिंध्यांचे आणि शारीरिक श्रमाच्या नोक-या कुठल्याही पगारात राबणा-या ‘अस्तित्ववादी’ उत्तरभारतीयांच्या ! मराठी तरुणांना आपली संस्कृति सोडाच, पण आपलं साधं ‘अस्तित्व’ टिकवण्यापुरता तरी ‘कोपरा’ महाराष्ट्रात शिल्लक राहील का, हा यक्षप्रश्न आहे ! त्यांना त्याच्या महाराष्ट्रातच लपण्याच्या जागा शोधाव्या लागतील, एवढी वाईट अवस्था मराठी तरुणांसाठी नजिकच्या भविष्यात येऊ घातलीयं. तो, आज मुंबई-ठाण्याचा मध्यवर्ति भाग सोडून दूरदूर धापा टाकत पळतोयं… ती साधी बाब होती, असं उद्या म्हणावं लागेलं… कारण, उद्या हे पळणं, ‘महाराष्ट्रव्यापी’ होणार आहे…. कारण, केवळ नोकरी-धंदेच नव्हेत; तर, आता मराठी माणसांच्या ‘जमिनीचे सातबारे’सुद्धा फार मोठ्याप्रमाणावर झपाट्यानं ‘शेठजीं’च्या घशात चाललेतं… ते, तुमच्या धंदेवाईक, स्वार्थी व फसव्या राजकारण्यांमुळे !…… पोलीसी निवड चाचणीत धावताना दोन-पाच मराठी मोत्ये ‘गळाले’; पण, या “महाराष्ट्रव्यापी पळपळीच्या शर्यतीत” अख्ख्या महाराष्ट्राची आजची तरुण मराठी पिढी आणि भविष्यातल्या पिढ्या ‘गारद’ होणार आहेत, ही माझी भयसूचक पण, दुर्दैवानं फोल ठरु ‘न’ शकणारी भविष्यवाणी आहे…. !!!

पोलीसदलात शिरणा-या… शिरु पाहणा-या निदान मराठी तरुणांनी तरी, या अमानुष व भयानक घटनेनंतर मनाशी निर्धार केला पाहीजे की, “मी पोलीस सेवेत कुठल्याही परिस्थितीत गैरमार्गाने व भ्रष्टाचाराने पैसा कमावणार नाही !”…. तरच, तुमच्या ‘अंतरीचा दिवा’ पेटता राहील व अशात-हेच्या, तुम्हाला किंवा तुमच्या भाईबंदांना पोलीससेवेत असताना वा सेवेत दाखल होण्यापूर्वी, दिल्या जात असलेल्या अन्यायपूर्ण वागणुकीचा तुम्ही सनदशीर मार्गाने प्रतिकार करु शकाल !…. या दारुण घटनेनं, पोलीस सेवेतील कनिष्ठ कर्मचा-यांसाठी एका विधायक व सदैव कार्यरत राहू शकणा-या, ‘संघटना-स्थापने’च्या अावश्यकतेला अधोरेखित केलेलं आहे… ती काळाची गरज आहे; हे पोलीसदलातील कर्मचा-यांनी वेळीच ध्यानात घेतलं पाहीजे….

जय महाराष्ट्र। जय हिंद।।

राष्ट्रांतर्गत राष्ट्र…. स्वायत्त महाराष्ट्र !
संयुक्त महाराष्ट्रानंतर….. आता, स्वायत्त महाराष्ट्र !!!

…… राजन राजे(अध्यक्ष- धर्मराज्य पक्ष)

 

Advertisements

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s