Marathi Article img

” नरेंद्र मोदी सरकारप्रणित ‘पीएफ’चे (Provident Fund) नवीन कामगारविरोधी नियम रद्द करण्यासाठी, ‘बंगळुरु’मधील तयार कपड्यांच्या कारखान्यातले ‘दक्षिण भारतीय’ कामगार संतापानं पेटून उठत रस्त्यावर उतरले….. प. बंगालची सद्यस्थितीतील चालू निवडणूक-प्रक्रिया आणि तामिळनाडू, केरळ, पाँडेचरीमध्ये होऊ घातलेल्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भेदरलेल्या, बड्या भांडवलदारांचे हस्तक असलेल्या मोदी सरकारने तत्काळ घेतली माघार “….. एक कालपरवाची मोठी बातमी !

दक्षिण भारतातलं साध्या ‘पीएफ’ नियम-बदलाबाबतच हे चित्र…. तर इकडे महाराष्ट्रात मात्र, कामगार-कर्मचारी चळवळ मोडून काढण्यासाठी गेली काही दशके एकापाठोपाठ एक जोरदार ‘आघात’ अखंडितपणे सुरुच आहेत….. तरी, कोणाला ‘इतना सन्नाटा क्यूँ है भाई’, असा साधा प्रश्न विचारावासा वाटत नाही ! हे आक्रित घडलं कसं…. घडतयं कसं ? मराठी-कामगार नांवाच्या ‘अल्बर्ट पिंटो’चा ‘गुस्सा’ कायमचा ‘डीप-फ्रिझर’मध्ये कोणी फेकून दिला ??…. “कारखाना जगला तरच, कामगार जगेल”, असे कामगारांना भेदरवून…. गारठवून टाकणारे हाकारे कोणी दिले ???

मराठी कामगारांचा हा ‘घात’ करण्यात सर्वात पुढे कोण असेल; तर, “मराठी माणसांच्या नांवाने उठताबसता गळे काढणार्‍या चुलतसेना” ! कामगार-कर्मचार्‍यांना उध्वस्त करण्याकामी, काँग्रेस-राष्ट्रवादीवाल्यांवर ‘वरताण’ करणारं, ‘कमळ-धनुष्यबाण’वाल्यांचं सरकार महाराष्ट्रात सत्तेवर आल्यानंतर तर, पुन्हा त्या कामगारविरोधी कारवायांना ऊत आलायं….. तरी ‘मराठी कामगार’ थंडगारच !

सध्या ‘मराठी कामगार’ कोण ?…. तर, बदमाष राजकारण्यांच्या नादाला लागून जो, सण-उत्सव-मनोरंजन-खेळाची फुकटची ‘भांग’ चढवून…. कायम ‘गार’ व निपचित पडून असतो आणि म्हणून या राजकीय व्यवस्थेद्वारा आयुष्यभर सरेआम लुटला जातो….. तो ‘मराठी-कामगार’, अशी दुर्दैवी व्याख्या तयार झालीयं. कदाचित, पोटाच्या प्रश्नासारख्या मूलभूत व सर्वात महत्त्वपूर्ण विषयावरील, मराठी कामगारांची ही थंड’गार’ वृत्ती पाहूनच, कारखान्यात राबणाऱ्या मराठी श्रमिकांसाठी ‘कामकार’, या शब्दप्रयोगाऐवजी ‘कामगार’, हा शब्दप्रयोग केला गेला असावा.
देशातली, महाराष्ट्रातली राजकीय व्यवस्था जेव्हा, या सदैव ‘गार’ पडलेल्या, ‘मराठी-कामगारा’च्या खिशात हात घालून हातसफाईने हजार रुपये लुटते; तेव्हा, निवडणुकीत त्यातले दहा ‘रुपडे’ दारु, बिर्याणी, मंडळांना देणगी, सार्वजनिक सणउत्सव-पूजा, भेटवस्तू वगैरेसाठी वाटते…. तेवढ्यानेही, हातात वर्षाचे बारा महिने वर्गणीची ‘पावतीपुस्तकं’ घेऊन ‘शेठजी-संस्कृति’च्या (धनदांडग्या जैन-गुज्जू-मारवाड्यांची !) दारोदारी फिरणारी, आमची “फुकटी मराठी तरुणाई”, निवडणुकीच्या काळात आपल्या ‘आत्म्या’ची बोली लावून मोकळी होते !!

अरे, उत्तर भारतीय भूमीत ‘उदंड’ झालेले
भैय्ये कामगार, इथे महाराष्ट्रातल्या मराठी श्रमिकांचा-भुमिपुत्रांचा सत्यानाश करत महाराष्ट्राच्या ऊरावर सर्वत्र थयथयाट करतायतं…. तरी तुम्ही, अजूनही भलत्याच विश्वात मश्गुल ? महाराष्ट्रभर उद्योग-सेवाक्षेत्रात कंत्राटी-कामगार/कर्मचारी पद्धतीतील ‘गुलामगिरी व नव-अस्पृश्यते’चा महारोग फसफसत असताना, सोशलमिडीयातील निरर्थक जातीय-धार्मिक वितंडवाद-चर्चा आणि प्रस्थापित ढोंगी-दलाल मराठी राजकारण्यांच्या चमकदार भाषणांच्या ‘मायावी’ दुनियेतच तुम्ही अडकलेले ?? आपण, सारी सामान्य घरातली मराठी माणसं, अवसानघातकी ‘सेल्फ-डिस्ट्रक्टिव्ह् मोड’ मध्ये तर नाही ना जाऊन पोहोचलेलो ???

मित्रहो, त्यांच्याकडे उत्तर भारतात फक्त एकच कारखाना तिन्हीत्रिकाळ चालू असतो…. तो म्हणजे, “ढीगभर पोरं पैदा करण्याचा” ! पोरं पैदा करायची आणि मोठी झाल्यावर पोसेनाशी झाली की, महाराष्ट्रात रेल्वेगाड्या भरभरुन पाठवायची. म्हणूनच आम्ही नेहमी म्हणतो की, “यूपी-बिहार, ही भारतीय-संस्कृतिची ‘हार’ आहे आणि यूपी-बिहार ही ‘संतों’की भूमि नसून केवळ, ‘अनगिनत सन्तानों’की भूमि है…. बस्स् !” आपल्याच अफाट लोकसंख्येच्या दबावाखाली गुदमरणारे (पण, त्याची साधी समज नसणारे !) व चांगलंचुंगलं सन्मानाने जगण्यासाठी नव्हे; तर, केवळ गुराढोरांसारखं दुसर्‍याच्या ताटातलं ओरबाडून ‘तगण्या’साठी धडपणारे….. उत्तर भारतीय कामगार, हे धनदांडग्या जैन-गुज्जू-मारवाड्यांच्या पाठोपाठचं महाराष्ट्रावरचं फार मोठं संकट आहे ! आपल्या या हलाखीच्या स्थितीतून उत्तर भारतीय कामगार काही धडा घेतील व स्वतःमध्ये सुधारणा करतील….. संघर्ष करतील, ही अपेक्षाच धरणं मूर्खपणाचं ठरेलं. “मराठी माणसांच्या नांवाने गळे काढणार्‍या पण, प्रत्यक्षात मराठी माणसांचे गळे कापणार्‍या” राजकारण्यांसाठी हे असले, कुठल्याही परिस्थितीत व कुठल्याही फडतूस मजुरीवर काम करणारे ‘उत्तर भारतीय भय्ये’ (त्यात, आता बंगाल-उत्तराखंड-ओरिसा प्रांतातल्यांची भर पडत चाललीयं) म्हणजे, त्यांच्या लुटालुटीच्या ‘राजकीय धंदापाण्या’ला (कामगार पुरवण्याची कंत्राटं घेण्याच्या व फसवे पगार-बोनसवाढीचे करार करुन कंपनी-व्यवस्थापकांकडून टक्क्यांनी प्रचंड मलिदे खाण्याच्या ‘धंदापाण्या’ला !) ‘वरदान’च ठरतात. म्हणून, संपूर्ण महाराष्ट्रभर प्रस्थापित राजकीय पक्षांचेच पदाधिकारी कंत्राटदार; पण, बहुशः ‘कंत्राटी-कामगार’ मात्र उत्तर-पूर्व भारतीय , असं उद्वेगजनक चित्र दिसतयं.  उत्तरभारतीय ‘लेकुरे उदंड झाल्या’मुळे,  स्वस्त-मजुरांचा सुरु झालेला हा, कधिही न आटणारा…. न संपणारा मुबलक पुरवठा म्हणजे, शोषक भारतीय भांडवलशाहीला व मोदीप्रणित ‘मेक इन इंडिया’लाही फार मोठं उत्तर भारतीय ‘वरदान’ आहे….. म्हणूनच, ‘सक्तिचं कुटुंब-नियोजन’ हे एकमेव ‘धर्मराज्य पक्षा’च्या अजेंड्यावर आहे !

“भारतीय घटनेनं भारतात कुठेही जाऊन नोकरी-धंद्याचं दिलेलं ‘अनिर्बंध-स्वातंत्र्य’च एकप्रकारे, महाराष्ट्रात सामान्य मराठी माणसाच्या मुळावर आल्याचं, हे सत्य भीषण चित्र आहे !!!”

“उत्तर भारतीय, त्यांच्या अफाट संख्येमुळे आणि धनदांडगे जैन-गुज्जू-मारवाडी त्यांच्या अफाट पैशामुळे”, महाराष्ट्रातल्या मूळ सर्वसामान्य भोळसट मराठी माणसाला (आजच्या भांडवली परिभाषेत, फक्त स्वतःचा उघडानागडा स्वार्थ साधण्यासाठी, ‘निसर्ग-पर्यावरण व माणसां’चा बेलाशक बळी द्यायला तयार असणाऱ्या जमातींसारखा, “स्मार्ट” नसलेल्या !)…. यापुढे केवळ, देशोधडीला लावून गप्प बसणार नाहीत. तर, मराठी घाम-रक्त ‘कंत्राटी बाजारा’त अतिशय स्वस्तात विकणाऱ्या सर्वपक्षीय भ्रष्ट-घराणेबाज व दलाल मराठी राजकारण्यांचा हात, याहीपुढे असाच हातात धरत…… त्याला ‘गुलाम व नव-अस्पृश्य’ म्हणून, महाराष्ट्राच्या मातीत कायमचा गाडतील !

एक ‘अस्पृश्यता’ निवारताना हजार वर्षे खर्ची पडलीत; वेळीच आपण ‘राजकीयदृष्ट्या’ जागे झालो नाही तर, ही नवतंत्रज्ञान-सुसज्ज ‘नव-अस्पृश्यता’ आणि त्यातून निर्माण झालेली जगण्याची ‘कोंडी’, पुढे दहा हजार वर्षे ढिम्म हलणार नाही !

महाराष्ट्राच्या विधिमंडळात नुकतेच, केवळ मूठभर सदस्यांनी रात्री उशिरा आरामात कुठलाही विरोध न होता (सगळीच राजकीय ‘मिलीभगत’, म्हणून आळीमिळी गूपचिळी),  ‘कंत्राटी-कामगार/कर्मचारी’ नांवाच्या ‘गुलामां’भोवतीचे पाश पूर्णपणे आवळणारे घातकी बदल ‘कंत्राटी-कामगार कायद्या’त केले. तरीही, मराठी कामगारविश्वामध्ये अगदी टाचणी पडली तरी भंगेल, एवढी प्रगाढ शांतता आहे….. ही, “मंदिर-मस्जिद-चर्च-गुरुद्वारातील पवित्र शांतता नव्हे; तर, मुडद्याफरासांची अपवित्र स्मशान-शांतता आहे”, हे आम्ही पोटतिडकीने बेंबीच्या देठापासून केव्हाचचं ओरडून सांगतोयं. वरकरणी गळपटून ‘सामसूम’ झालेलं हे कामगारविश्व आयपीएल क्रिकेट सामन्यांची, महापुरुषांच्या जयंत्या-मयंत्यांची, सार्वजनिक सत्यनारायण पूजांची ‘धामधूम’ आजूबाजूला जमेल तशी मनवत मात्र आहेच…. मग, महाराष्ट्रात दुष्काळ पडलेला असो वा कामगारविरोधी धोरणांचा पाऊस पडलेला असो ! निर्दयी भांडवली-अर्थव्यवस्थारुपी काळसर्पाच्या जबड्यात चाललेली ही ‘कामगार-कर्मचारी’ नांवाची ‘मराठी बेडकं’, जाता जाता आजुबाजुला फिरणारी ‘करमणुकी’ची पाखरं, आपल्या लवलवत्या जीभेनं टिपतायतं, एवढाचं त्याचा अर्थ ! या हतवीर्य झालेल्या मराठी कामगार-कर्मचार्‍यांना, हल्ली संपासारखी टोकाची कामगार-आंदोलनं झेपत नाहीत; म्हणून आम्ही त्यांच्या ‘नाजुक’ प्रकृतिमानाला झेपेलं अशातर्‍हेचा  निर्णय घेऊन, ‘माणूस आणि निसर्ग’ यांचं अव्याहत चालू असलेलं भीषण शोषण थांबवण्यासाठी “धर्मराज्य पक्षा”ची स्थापना केली. विचार आणि विश्वास हा आहे की, निदान इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशिनवरची ‘धर्मराज्य पक्ष’ उमेदवारांच्या नांवापुढची बटणं दाबण्याइतक तरी बळ, या पिचलेल्या ‘मराठी मनगटा’त असेल…. पण, अजूनतरी या गुलामांची झोप उडायला तयार नाही…. ग्लानी संपायला तयार नाही !
नजिकच्या भविष्यात मात्र ती संपेलच……

तेव्हा, “धर्मराज्य पक्षा”चा अंतिम-सत्यवादी एकच अखेरचा पर्याय, या शिवछत्रपतींच्या महाराष्ट्रापुढे समोर उभा असेल…. या महाराष्ट्रातल्या सामान्य मराठी माणसांच्या नशिबी असेल; तर, “धर्मराज्य पक्षा”ची शंभर टक्के न्यायी, नीतिमान व कल्याणकारी अशी खरीखुरी ‘शिवशाही’ व ‘रामराज्य’ तो त्याच्या हयातीतच प्रथमच अनुभवेलं….. तिथे, रावणाच्या लंकेची ‘अनीतिमान’ संपन्नता नसेल; पण, अयोध्येची ‘समानता आणि नीतिमानता’ नक्कीच असेल…. आणि, संत-सज्जनांच्या मूळ मायमराठी-संस्कृतिला स्मरुन, साध्या शाश्वत-जीवनशैलीच्या अनुसरणानं आलेली ‘निसर्ग-संपन्नता’ तर अगदी उदंड असेल !
अशा, महाराष्ट्रातल्या विदर्भ-मराठवाडा-कोकणाला महाराष्ट्रातून फुटून निघण्याची इच्छाच कशी होईल ???
…….बुद्ध, ईश्वर, अल्लाह, वाहे गुरु, जीझस त्यासामान्य मराठी जनांना सदबुद्धी देवो !!!

(संयुक्त महाराष्ट्रानंतर आता, स्वायत्त-महाराष्ट्र….. राष्ट्रांतर्गत राष्ट्र, ‘स्वायत्त-महाराष्ट्र’ !)

जय महाराष्ट्र । जय हिंद ।।
…..राजन राजे (अध्यक्ष: धर्मराज्य पक्ष)

Leave a comment